कोंढवा – चोरीतील आरोपीचा अश्रफनगरमध्ये पर्दाफाश…टीप मिळताच सापळा रचला….
खादी एक्सप्रेस (प्रतिनिधी) : कोंढवा पोलिसांना गुंगारा देणारा, चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी युसूफ वजिर शेख यांस कोंढवा पोलिसांना टीप मिळताच शिफातीने सापळा रचून बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी सदर आरोपी कडून चोरीची एक चारचाकी, एक दुचाकी मोटार सायकल व दोन मोबाईल हस्तगत केले आहे, कोंढवा पोलीस ठाण्यात गुरनं ११०२ / २०२३(भादवी कलम ३८०.) दाखल गुन्हयातील आरोपीचा आरोपी युसूफ वजिर शेख हा आश्रफनगर येथे त्याचे राहते घरातील लोकांना भेटीसाठी येणार असल्याची गुप्तमाहिती पोलीसांना प्राप्त होताच, कोंढवा पोलिसांनी अलीफ टॉवरच्या बाजुला मोकळ्या मैदानात सोबतच्या पोलीस स्टाफसह सापळा रचून आरोपी युसुफ शेख हा सायं. ७:०० वा. घरातील लोकांना भेटण्यासाठी येणार असलेबाबत बातमीदाराने कळविल्याने युसूफ वजिर शेख, (वय २३ वर्षे) रा. आश्रनगर, ग.नं.७. न्यू ग्रीन बिल्डींग मध्ये, कोंढवा- खुर्द, पुणे यास ताब्यात घेवुन दाखल गुन्हयाबाबत विचारणा केली असता त्याने वरील गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.तसेच सदर आरोपीवर आणखीनही दाखल गुन्हे ज्यात १) कोंढवा पोलीस ठाणे, पुणे गुरनं ११०५/२०२३.भा.दं.वि. कलम ३७९ २) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरनं. १०७७/२०२३.भा.दं.वि. कलम ३७९ ३) कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरनं. ११०२/२०२३ असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ-०५, श्री. विक्रांत देशमुख, मा.सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री शाहुराजे साळवे, वरिष्त पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे, श्री. संदिप भोसले, श्री. संजय मोगले यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.