कोंढवा खुर्द – API विश्वास भाबड यांची सिंघम एन्ट्रीने…पारगे नगर, कौसर बाग नाईट लाईफ एक्झिट ….!
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) : “4 बज गये लेकीन पार्टी अभी जारी है”…अशीच काहीशी परिस्थिती मागील अनेक दिवसांपासून पारगे नगर मध्ये दररोज पाहायला मिळतेय…हॉटेल, पान टपरी, चहाची दुकाने यांनी आपलेच एक वेळापत्रक आखून ठेवल्या प्रमाणे सर्व ठिकाणी नियमाने रात्री 11-12 वाजता बंद होणारी दुकाने पण पारगे नगर मध्ये आपल्याच नियमाने चालणारे हे हॉटेल आणि दुकाने मात्र दररोज जवळजवळ पहाटे पर्यंत रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत सुरू…हॉटेल, टपऱ्या समोर गाड्या लावून, सिगरेटचा सुट्टा घेत मोठमोठ्याने होणाऱ्या गप्पा- गोष्टी, गाण्यांचे आवाज, मोकाट लोकांची मोठ्या प्रमाणात जमणारी गर्दी….पारगे नगरच्या रात्रीच्या रुपामुळे येथील रहिवासीयांची झोप तर छू मंतर झाली, पण लहान मुले, वयोवृध्द लोक यांना देखील या नाईट लाईफ मुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत…पण जेव्हा कोंढवा पोलीस API विश्वास भाबड यांनी या गोष्टीची दखल घेऊन पारगे नगर, कौसर बाग मध्ये १४ डिसेंबर रोजी रात्री सिंघम एन्ट्री केली आणि रात्र भर सुरू असलेल्या हॉटेल दुकानावर धडक कारवाई करत अशी नियमाची शिकवण दिली की काही क्षणातच कायापालट… API भाबड यांना पाहताच मोकाट गर्दी करणाऱ्यांनी एकच धूम ठोकली..एका मागे एक वेळेचे भान न ठेवणाऱ्या दुकानाचे शटर खाली होऊ लागले…अचानक झालेल्या धडक कारवाईने या शिरजोर लोकांना चांगलीच अद्दल घडली..API विश्वास भाबड यांच्या ऍक्शन मोडने पारगे नगर, कौसर बाग मध्ये पुन्हा कधीही नियम मोडून रात्र जत्रा भरणार नाही हे नक्की सोबतच भाबड यांनी नागरिकांना ‘या पुढे कोंढवा भागात कुठेही ट्रॅफिक, नाईट लाईफ, मोकाट लोकांच्या शिरजोरी, त्रासा विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये आपली लेखी तक्रार नोंदविण्याचे आव्हाहन देखील केले जेणे करून कोंढवा परिसरात नवजन्म घेणारी गुन्हेगारी वर पूर्णविराम लावता येईल”..गुन्हे पोलीस निरीक्षक मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली API भाबड, सह पोलीस पथकाच्या या दबंग कारवाईने परिसरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेत विश्वास भाबड यांचे आभार व्यक्त केले….