कोंढवा खुर्द – दाद त्या पावसाची…ज्याने उघडला कोंढव्यातील बोगस कामाचा चेंबर …!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) : वाह कोंढवा वाह ! काय ते रस्ते…आणि चेंबर तोडून वाहणारे ते पाणी…खरे तर कौतुक केले पाहिजे या पावसाची जो येतो आणि शासनाच्या बोगस कामाची सत्यता दाखवून जातो, चेतना गार्डन शेजारी, मिठा नगर लेन नं. ९, कोंढवा खुर्द मधील रस्त्यातील दृश्य सध्या या बोगस कामाचा उलगडा करतोय, पावसाच्या आगमन होतच या रस्त्यावरील चेंबरचे झाकण अक्षरशः काही तुटले तर काही उघडुन पडले आहे ज्यातून वाहणाऱ्या पाण्याने रस्ता तुडुंब भरला असून नदीतून प्रवास करतोय की काय असा अनुभव सध्या कोंढवा वासियांना येतोय..उन्हाळा, हिवाळा जो या बोगस कामांवर पांघरून घालतो तोच पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने निकृष्ट दर्जाचे कामाचा पांघरून काढून टाकतो पण या बोगस कामामुळे मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही पाण्याने रस्ता जणू छु:मंतर झाल्याने अपघाताची परिस्थिती निर्माण झाली आहे…

लाईव्ह फोटो – गल्ली क्र ९ चेतना गार्डन

मुख्य: म्हणजे सदर रस्त्याचे अनेक वेळा दिखावा म्हणून काम केले गेले असून ते काम किती उत्कृष्ट दर्ज्याचे झाले आहे याची सत्यता देखील चेंबर च्या झाकणा प्रमाणे उलगडून पडला आहे….

लाईव्ह फोटो – गल्ली क्र ९ चेतना गार्डन

नागरिकांच्या जीवाला निर्माण झालेला धोका आणि रस्त्याची दुरअवस्था लक्षात घेऊन शासनाने नागरिकांची जीवित हाणी होण्यापूर्वी लवकरात लवकर सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे…

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल