कोंढवा खुर्द….! ‘आलोच काही वेळात ‘ बोलून घराबाहेर गेला अन् परतलाच नाही….
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ऑनलाइन:– आसिफ आरिफ शेख, वय ३२, रा. अशर्फिया मंजिल, मिठा नगर, कोंढवा खुर्द येथील युवक (२ सप्टेंबर) शुक्रवारी नमाज पठणा करता घरा बाहेर पडला परंतु त्या नंतर तो घरी परतला नाही…
अचानक बेपत्ता झालेला आसिफ शेख हा शुक्रवारी सकाळी ११:०० च्या सुमारास आपल्या ॲक्टिवा ६ जी गाडी घेऊन बाहेर पडला, संध्याकाळ उलटून गेल्यानंतर ही आसिफ परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली परंतु त्यांना काही यश मिळाले नाही, आसिफ बेपत्ता झाल्याची खात्री होताच, आसिफ यांची पत्नी उजमा शेख यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आसिफ यांची बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली आहे,आसिफ २ सप्टेंबर शुक्रवारी घरा बाहेर पडताना त्याची निळ्या रंगाची ॲक्टिवा ६ जी गाडी ( नंबर एम. एच.१२, टी. एफ. ७२५२ ) घेऊन निघाला होता त्या वेळी त्याने नेसणीस ग्रीन कलर ची नाईट पँट आणि गुलाबी कलर चा हाफ टी-शर्ट परिधान केला होता,
आसिफ याचे वय वर्ष ३२, रंगाने गोरा, दाढी मिशी राखलेली, उंची ६ फूट असून या वर्णनातील व्यक्ती कोठेही दिसून आल्यास खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा:
*खादी एक्सप्रेसचे संपादक : 7276298885