खादी एक्सप्रेस (ऑनलाईन) :पुणे महानगरपालिका अंतर्गत स्वच्छ पुणे सुंदर पुणे या ब्रिदवाक्याने स्वच्छ भारत अभियान सुरू करून दारोदारी घनकचरा विभागाची गाडी आणि कर्मचारी मार्फत नागरिकांकडून कचरा जमा करण्यासाठी पाठविलेले नियुक्त कर्मचारी नागरिकांचा कचरा कचरा गाडीत टाकण्यासाठी प्रति घर ९०/- रु. आकारणी घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे, आणि जर पैसे दिले नाही तर हे कर्मचारी कचरा स्वीकारण्यास साफ नकार देत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे…कोट्यवधी पैसे लावून सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगर पालिकेने टेंडर पास करून नियुक्त केलेले कर्मचारी नागरिकांची अश्या प्रकारे करत असलेली ‘वसूली कम लूट ‘ च्या प्रकारातून पालिका कर्मचाऱ्यांना पगार देते का…? जर पालिका पगार देते तर नागरिकां कडून सुरू असलेल्या या लूट ला जबाबदार कोण…? मुळात प्रत्येक घर या कर्मचाऱ्यांना कचरा टाकण्यासाठी पैसे देऊ शकत नाही ..? जे पैसे देणार त्यांचाच कचरा स्वीकारल्यावर गरीब लोकांनी कचरा कुठे टाकायचा…? पर्याय उरतो तो रस्ता …. त्यातून होणारी घाण..आजार…पर्यावरणाचे नुकसान …..मग पालिकेच्या अभियानाचे काय….पालिका कचरा विभागातील कर्मचाऱ्यांना पालिकेने गणवेश दिला असताना ‘ आम्ही पालिकेचे कर्मचारी ‘ असे म्हणून कचरा स्वीकारण्यासाठी ९०/- रु. आकारणारे हे लोक गणवेशात नसतात….तर पालिके कडून कोट्यवधीचे टेंडर पास करताना घालून दिलेल्या अटी शर्तीचे काय…?

कोंढवा विभागातील घनकचरा विभाग मुकादम सुरेखा धावरे यांच्याशी जेव्हा ‘ खादी एक्सप्रेस ‘ ने पालिका व्यवस्थापन बाबत माहिती घेतली असता ‘ आमची कचरा गाडी प्रत्येक गल्लीत जाऊ शकत नाही त्या मुळे स्वच्छ संस्था मार्फत प्रत्येक गल्ली मध्ये जाऊन लोकांकडून कचरा गोळा करून आम्हाला देण्यात येतो…आम्ही नागरिकांकडून पैसे आकारात नाही प्रायवेट स्वच्छ संस्था वाले घेत असतील …’ पालिका मुकादम कडून मिळालेल्या या उत्तराने बरेच प्रश्न उभे राहिले आहे…मुळात पालिकेने सर्व गोष्टी जसे खुला वर्दळी भाग जेथून कचरा स्वच्छ करायचा आहे लक्षात ठेऊन त्या अनुषंगाने लहान आणि मोठे आकाराच्या गाड्या या अभियानासाठी आवश्यक म्हणून कोट्यवधीचे टेंडर , ठराव करून कचरा गाड्यांवर खर्च केला जर हा तर प्रायवेट कचरा गाडीच कचरा घेण्यासाठी का येतात… मुळात पालिकेने स्वच्छ अभियान राबवताना फक्त मोकळ्या सुटसुटीत परिसरच लक्षात घेतला नसावा … शहर स्वच्छ करताना त्यात गर्दी वर्दळीचा भाग लक्षात घेऊन पालिकेने नियोजन आणि त्या वरच मुकादम नियुक्त करून टेंडर पास केले तर या सर्वात स्वच्छ संस्था म्हणून वैयक्तिक लोकांचा सहभाग आणि त्यातून पालिकेचे नाव पुढे करून नागरिकांना पैश्यासाठी होणारी दमदाटी वसूली या सर्वांना जबाबदार कोण….?
खादी एक्सप्रेस कडून कोंढवा परिसरात ‘ अपना कोंढवा साफ कोंढवा ‘ अभियान राबविणारे कोंढवा माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्याशी संपर्क करून सदर घटना निदर्शनास आणून दिली असता त्यांनी नेहमीप्रमाणे जबाबदारी पुढाकार घेत ‘ उद्या सकाळी मी स्वतः त्या परिसरात कचरा गाडी सोबत येऊन निरक्षण करणार जेणे करुन लोकांची फसवणूक वा लूट होणार नाही याची काळजी घेईल..’ या उत्तराने दिलासा तर झाला पण आणखी बऱ्याच ठिकाणी पालिका टेंडर खाऊन मुकादमांकडून होणारी हलगर्जी पण यावर आळा आणणे गरजेचे आहे …
या व्हिडिओ ने नागरिकांची लूट आणि बरेच प्रश्न देखील समोर आले आहे.. जर पालिकेचा पगार खाऊनही वरची मलाई म्हणून गरीब नागरिकांकडून लूट सुरू असेल तर अशा लोकांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करणे अवश्यक आहे …