कोंढवा खुर्द : अशोका म्युज सोसायटी परिसरात कोयत्याने डोक्यात वार अन् कायमचे केले तडीपार…..!
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) : सुमित ऊर्फ काकासाहेब जाधव (रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे हत्त्या झालेल्या युवकाचे नाव असून, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अशोका म्युज सोसायटी परिसरात तीन इसमांनी सुमित जाधव वर डोक्यात कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. पोलिसांनी याची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यु झाला. सुमित जाधववर खूनाचा प्रयत्न,, गंभीर दुखापत करने ,लुटमार, लोकांना दमदाटी, धमक्या देणे, अशा अनेक प्रकारचे ८ गंभीर गुन्हे दाखल होते, प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरुच राहिल्याने त्याला तडीपार करुन अहमदनगर, भिंगार या ठिकाणी सोडण्यात आले होते. सन २०२१ डिसेंबर मध्ये पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच पुणे जिल्ह्यातून तडीपार केले गेले असताना देखील सुमित जाधव हा पुण्यातच वास्तव्यास होता, या संबंधी संबंधित तीन आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे