कसबा पेठ येथील समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्षा कडून दोन समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न…!मिलिंद एकबोटे सह २० जणांवर गुन्हा दाखल.

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन): हिजाब प्रकरणा मूळे भारतात हिंदू- मुस्लिम या दोन गटात एक तडा निर्माण झाल्या-झाल्या त्या पाठोपाठ कसबा पेठ येथील पवळे चौक येथील समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्या सह आणखी २० जणांवर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पूनेश्र्वर मंदिर परिसरातील दर्ग्याच्या कामाला स्थगिती असताना, दर्ग्याच्या काम सुरू आहे अशी खोटी अफवा समाजात पसरवली सोबतच पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपीं कडून कट कारस्थान रचून जाणून बुजून दोन समाजात एकमेकांन विषयी द्वेष, तिरस्कराची भावना निर्माण करणारे लेख, संदेश, व्हिडिओ, निमंत्रण पत्रिका बनवून सर्व हिंदु धर्मियांना आवाहन करून पवळे चौकात एकत्रित केले आणि १ मार्च रोजी पार पडलेल्या कसबा पेठ येथील महाशिवरात्रीच्या कार्यक्रमा दिवशी सर्वजण एकत्र जमून महाआरती केली, पोलीस सह आयुक्त यांनी जरी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशा कडे फेटाळून सोशल मीडियावर दोन समाजात एकमेकांना विषयी द्वेष निर्माण, खोटे, दिशाभूलीचे करणारे लेख पोस्ट केले. मतदाना च्या काळात काही मत मिळवण्या साठी दोन गटांमध्ये द्वेष, दंगल निर्माण करून समाजात अशांतता पसरवण्यासाठी संबंधित लेखा विषयी SDPI जिल्हा शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलिस अधिकारी ACP, DCP यांच्या निदर्शनास आणून दिली कार्यक्रम थांबवून त्वरित कार्यवाही केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करीत द्वेष पसरविणाऱ्या भाजपा पदाधिकारी व जातीवादी शक्तिच्या समाज कंठकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्यादी कडून गुन्हा दाखल करण्यात आला, मागील दोन महिन्यापूर्वीच खडक पोलिस स्टेशनमध्ये मिलिंद एकबोटे यांच्यवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातील नातूबाग येथे 19 डिसेंबरला शिवप्रताप दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी मिलिंद एकबोटेसह सहा जणांविरोधात खडक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद एकबोटे, मोहनराव शेटे, दीपक बाबुलाल नागपुरे, कालीचरण महाराज, कॅप्टन दिग्रेंद्र कुमार आणि नंदकिशोर रमाकांत एकबोटे या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा मिलिंद एकबोटे अडचणीत सापडले आहेत या प्रकरणात समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि वैभव वाघ यांच्या व्यतिरिक्त इतर २० जण सुनील सदाशिव तांबट ( वय ५३, कसबा पेठ), स्वप्नील अरुण नाईक (वय ३६, गुरुवार पेठ),मुकुंद पाटोळे( वय ६२, मंगळवार पेठ), मिलिंद एकबोटे (वय ६५, रेव्हेन्यू कॉलनी शिवाजी नगर),नंदकिशोर एकबोटे ( वय ६०,शिवाजीनगर), योगेश भालचंद्र वाडेकर ( ४१ शुक्रवार पेठ), कुणाल कांबळे ( वय ३९,नवी सांगवी), रविंद्र ननावरे (वय ३३, पर्वतीदर्शन), संतोष अंगोलकर (वय४४, धनकवडी), धरुदत्त शिंदे ( वय ५२, सहकारनगर), धनंजय गायकवाड ( वय ५१, सदाशिव पेठ), प्रशांत कांबळे (वय २४, मंगळवार पेठ), देविसिंग दशाना ( वय१८, कसबा पेठ), विकी रमेश चव्हाण (वय २५ कसबा पेठ), आदित्य कांबळे (वय १८ कसबा पेठ), विश्वजित भिसे ( वय २३, मार्केट यार्ड), आकाश माने ( वय १९, पद्मावती), आणि वैभव वाघ यांना नोटीस देवून सोडून देण्यात आलेले आहे. या प्रकरणात सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियांका ननावरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, यांनी सदर ठिकाणी हजेरी लावून परिसरात कडाक बंदोबस्त करण्यात आलेला आहे.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल