कचरा व्यवस्थापनात ‘हमरी – तुमरी’त लोहगावतील नागरीकांसह, गोमतांचाही जीव धोक्यात…..!
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ऑनलाइन : लोहगाव जो एक पॉश आणि उत्कृष्ट श्रेणी मध्ये मोडला जाणारा परिसर पण आज तेथे कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले आहे..ज्या साम्राज्याला प्रशासना कडून व्यवस्थापनासाठी कोणी वाली वारस पुढे येत नाहीये… पण प्रशासनाच्या या हलगर्जी, निष्काळजी आणि जबाबदारीच्या दुर्लक्ष करण्याच्या प्रकारामुळे आज लोहगाव परिसरातील नागरिक तसेच तेथील जनावरे, गाय यांच्या देखील जीवाला धोका निर्माण झाला आहे. या आधी देखील “खादी एक्सप्रेस” ने पुणे मेट्रो परिसरातील अश्याच एका प्रकारचा खुलासा केला होता ज्यात सर्रासपणे स्वच्छ नामक खाजगी संस्था गोळा केलेला कचऱ्याची विल्हेवाट सार्वजनिक ठिकाणच्या जाण्या-येण्याचा रस्त्यावर करत होते, कारण की या संस्थे मार्फत गोळा केलेला कचरा पालिका प्रशासन घेत नसे परिणामी ह्या कचऱ्याला रस्त्यावरच टाकून देण्यात येत होते, आणि आजची ही बातमी ज्यात या परिसरातील आणि सोसायटी मधील दैनंदिन कचरा गोळा करण्यासाठी नागरिक ‘स्वच्छ ‘ नामक एक खाजगी संस्थेस पैसे मोजतात जेणे करून परिसर स्वच्छ राहील पण ही खाजगी संस्था सदर कचरा गोळा करते खरे पण तो कचरा पालिका प्रशासनाचे संबंधित लोक स्वीकारत नाही परिणामी हा कचरा तेथीलच जवळच्या ठिकाणी फेकून दिला जातो की पालिका प्रशासन हा कचरा उचलून नेतील पण असे काही होत नाही, ज्यामुळे आज तेथे कचऱ्याचे नवीन साम्राज्यच निर्माण झाले आहे,कचऱ्याचा वाढता धिगाऱ, प्रशासनाचा निष्काळजीपणा यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंध पसरला असून जवळपास राहणाऱ्या नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, सारख्या आजारांना बळी पडावे लागत आहे, मुख्य म्हणजे काचऱ्याच्या ठिकाणी येणारी जनावरे, कुत्री विशेष गोमाता यांच्या देखील कचऱ्यातील प्लास्टिकच्या पिशव्या, तारीख निघून गेलेले औषधे इतर विषबाधित वस्तू नकळत खातात आणि अन्नाच्या शोधत त्यांना आपले प्राण गमवावे लागत आहे, परिणामी पालिका प्रशासन लोहगाव परिसरातील कचऱ्याबाबत कोणत्याच प्रकारे आपली कामगिरी दाखवत नसल्याने पर्यायी लोहगाव परिसरातील कार्यकर्ते आपल्या खिशातून पैसे मोजून कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करताच, पालिका प्रशासन कडून त्या गोष्टीला देखील नागरिकांना आणि परिसरातील कार्यकर्त्यांना विरोध केला जातोय, की, ” हे तुमचे काम नाही आम्ही आमच्या प्रमाणे करू” तर या हमरी – तूमरी मध्ये नागरिक, आणि प्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. लोहगाव विभागातील आरोग्य निरीक्षक सुषमा मुंडे यावर काही कारवाई करतील…? आता हा कचऱ्याच्या प्रश्न सुटेल का याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हा विषय देखील जमा होईल…? आखेर कधी पर्यंत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा परिणाम सामान्य नागरिकांना होणार…!