ओला-सुका कचरा स्वच्छ पुणे संस्थेकडे व पातळ कचरा मेत्रोयार्ड पुणे यांच्याकडे ?
पुणे (खादी एक्सप्रेस प्रतिनिधी):ओला व सुका हे कचऱ्याचे दोन प्रमुख प्रकारमानले जातात परंतु याशिवाय पातळ कचऱ्याचा एक प्रकार असतो ज्यामध्ये पातळ प्रकार असतात. पुणे महापालिका कचरा संकलकआपल्याकडे कचरा संकलित करण्यास आल्यावर आपण स्वच्छ पुणे या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना आपला कचरा देतो. हे कर्मचारीत्यांच्या अधिकाऱ्यांना हा कचरा देतात.त्यांच्यासाठी त्यांना पगार असतो. परंतु स्वच्छपुणे ही संस्था मात्र पातळ कचरा घेण्यास नकार देते व कचरा जमा करणाऱ्याकर्मचाऱ्यांना मात्र पातळ कचरा घेण्यास संबंधित अधिकारी नकार देतात, त्यामुळेकचरा जमा करणारे कर्मचारी सदरील कचराकुठेही फेकतात. कचऱ्यामध्ये ओला आणि सुका असे वर्गीकरण करण्यात आला आहे. या वर्गीकरणामध्ये पातळ कचरा याची व्याख्याच करण्यात आलेली नाही. खादी एक्सप्रेसने यावर नुकतेच येरवडा मधील मेट्रो यार्ड या ठिकाणी याबाबत निरीक्षण करून पातळ कचरा फेकणाऱ्या कर्मचाऱ्यांना गाठले व त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर ही लोक येरवड्या मधील मेट्रोच्या यार्ड मध्ये फेकत होते आणि आम्ही गरीब कर्मचारी असून स्वच्छ पुणे संस्था आमच्याकडे ओला व सुका कचरा घेते, परंतु एखादा पातळ कचरा असेल तर ती घेत नाही म्हणून आम्हाला सदर कचरा टाकावा लागतो. व इतर समस्या त्यांनी खादी एक्सप्रेसकडे मांडल्या.खाली व्हिडिओ पाहा 👇