उधारी वसूल करण्यासाठी हडपसर मध्ये तरुणाचे चक्क अपहरण…! ५ आरोपी अटकेत ..
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) :-: गरजेपोटी उधार म्हणून दिलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून अतिक तांबोळी (वय ३० मूळ गाव सोलापूर, सध्या राहणार हडपसर) या तरुणाची हडपसर येथून भर दिवसा अपहरण करण्यात आले. रविवारी सकाळी ११:३० च्या सुमारास शेवळेवाडी पेट्रोल पंप जवळ सदर घटना घडली, घटनेची पोलीस नियंत्रक कक्षाला माहिती मिळताच, गुन्हे शाखा सह. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे सहकारी यांच्या सोबत घटना स्थळी पोहोचले अतीक तांबोळी यांचा मोबाईल लोकेशन च्या मदतीने आणि मिळालेल्या गाडी नंबर च्या मदतीने नाना पेठ येथून पोलिसांनी आरोपींना अवघ्या ४ तासात पकडुन ५ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली तसेच आतिक यांची सुटका केली. अतिक सोलापूर मध्ये रहात असताना आरोपी छगन जगदाळे यांच्या कडून पैसे उसने घेतले होते, तदनंतर काम निमित्त पुणे येथे आली, आपले उसने पैसे परत करत नाही या गोष्टीचा राग धरून छगन जगदाळे ( वय ३३, ता. माढा जि. सोलापूर) आणि त्याचे इतर साथीदार दीपक ताकतोडे ( वय ३२), भगवान दत्तू शिंदे (वय ४८), विशाल सावंत (वय २५), विजय शितोळे (वय २७) अशी अटक आरोपींचे नावे असून या पैकी भगवान शिंदे या वर २०१० मध्ये खुनाच्या आरोपा खाली शिक्षा झाली आसून सध्या कोरोना होती. या सर्वांनी मिळून रविवारी आपल्या साडू (यासीन शेख) सोबत लग्नासाठी जात असताना पेट्रोल भरण्यासाठी शेवाळवडी पेट्रोल पंप वर उभ्या असलेल्या अतिक तांबोळी यास जबरदस्ती कार मध्ये बसवून त्याचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला सदर ठिकाणी सोबत असलेल्या अतिक यांच्या साडू ने गाडीचा नंबर घेऊन तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देऊन घटनेची माहिती दिली,पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टॉम्पे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे, हवालदार प्रमोद टिळेकर, महेश वाघमारे, दया शेगर,रमेश साबळे, पोलीस नाईक पृथ्वीराज पांडूळे या पथकाने सदर कामगिरी पार पडली.