उंड्री – अनधिकृत पत्रा शेडवर मोठी कारवाई…..पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून पोलीस बंदोबस्तात कारवाई…

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : उंद्री परिसरात अनधिकृत पणे उभ्या केलेल्या एकूण १५,७०० चौ. फूट पत्र्याच्या दुकानांवर पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागा झोन १ कडून दि.१३ ऑगस्ट (शुक्रवारी) रोजीपोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.

उंद्री येथील स.नं. ५१,५६,५७ आणि ५८ एक अतिशय महत्वाचा आणि रहदारी असा परिसर आहे. तसेच किराणा दुकाने, भाजी, बँक, औषधे, अशी लहान मोठी दुकाने ही असल्यामुळे येथे सतत नागरिकांची वरदळ असते. काही महिन्यांपासून या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या भाजी तसेच इतर किरकोळ वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानाची, ठेल्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढल्यामुळे या चौकात वाहतूकीस अडथळा येत असल्याच्या तक्रारीत वाढ झाल्याने मा. अधीक्षक अभियंता युवराज देशमुख व मा. कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता संदीप शिंदे यांच्या उपस्थितीत शाखा अभियंता भीमराव पवार, आणि कनिष्ठ अभियंता अनुप गज्जलवार यांच्या पथकाने दहा बिगारी, एक जेसीबी च्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल