अविश्वसनीय…चक्क मनपा आरोग्य कर्मचारीच ठरला अट्टल मोबाईल चोर …२ लाखांचा मुद्देमाल जप्त…!
पुणे ( खादी एक्सप्रेस ऑनलाईन ) : पुणे म न पा येथे आरोग्य विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या तानाजी शहाजी रानदिवे ( वय – ३३, रा. शांती नगर राम टेकडी हडपसर ) या मोबाईल चोरास हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. कारवाई मध्ये पोलिसांनी आरोपी कडून तब्बल २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बातमी अविश्वसनीयच वाटेल पण हे खरे आहे. मुख्य म्हणजे चोर एक म न पा आरोग्य कर्मचारी निघाला. बऱ्याच दिवसा पासून पुणे शहर मध्ये मोबाइल चोरीच्या घटने मध्ये वाढ झाली आहे. आणि म्हणूनच या साठी बिबवेवाडी पोलीस पथक सुधा नेमण्यात आली. आखेर गुप्तहेरांच्या महितेच्या आधारे पोलिस अमलदर सतीश मोरे यांना माहिती मिळाली की महावीर गार्डन जवळ मुख्य रस्त्यावर एक जण चोरी केलेले मोबाइल विकण्यात करिता येणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक बिबवेवाडी रस्त्या लागत गस्त घालून होते. येण्या जाणाऱ्या लोकांना मोबाईल विकताना आरोपी तानाजी याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्या वेळी आरोपी कडून ६ चोरीचे मोबाईल देखील मिळाले. अधिक तपास केले असता आरोपी कडून तब्बल १ लाख ८८ हजार रुपये किमतीचे मुद्देमाल ही जप्त करण्यात आले. कर्ज फेडण्यासाठी मार्केट यार्ड आणि बिबवेवाडी परिसरातून ५० पेक्षा अधिक मोबाईल चोरल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. ही सर्व कारवाई पोलीस उपनिरीक्षक नम्रता यांच्या मार्ग दर्शन खाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, पोलिस निरीक्षक गुन्हे अनिता हीवरकर यांच्या सुचणे प्रमाणे, सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर,पोलीस अंमलदार सतीश मोरे, तानाजी सागर, राहुल मोरे यांनी कारवाई केली.