‘अपना कोंढवा साफ कोंढवा’ तर हा कचरा कोणाचा…? पालिका की नागरिक अखेर कमी कुठे…
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : नेहमीच नागरिकांनी गजबजलेला आणि वर्दळीचा परिसर असा पुण्यातील कोंढवा परिसर ….पण याच वर्दळीत लक्ष वेधून घेणारा जागोजागी पडलेल्या त्या कचऱ्याच्या ढीगार डोंगराला दुर्लक्ष करावे तरी कसे…कोंढव्यातील नगरसेवक हाजी गफ्फुर पठाण यांनी ‘अपना कोंढवा साफ कोंढवा‘ ची हाक देत वेळोवेळी जनजागृती करत स्वच्छ्ता मोहीम राबवत आले आहे पण या मोहिमेला ना नागरिकांचा प्रतिसाद दिसून येत आहे ना महानगर पालिकेचा नुकत्याच ‘खादी एक्सप्रेस’ ने टिपलेल्या लेन नं. ५, ज्युपिटर शाळे शेजारी, शिवनेरी, कोंढवा खुर्द पुणे येथील परिस्थिती तर हेच सांगत आहे… मुख्य म्हणजे या ठिकाणी ‘अपना कोंढवा साफ कोंढवा‘ हे लक्ष्यात आणुन देण्याचा प्रयत्न केला गेलाय त्याच ठिकाणी कचऱ्याचा डोंगर दिसतोय….दुसरी कडे पालिकेच्या घंटागाडी कोंढवा परिसरात येरझाऱ्या मारत असल्याचे ही दिसते, तर हा कचरा का….? ‘ पालिकेची घंटागाडी फक्त हजेरीसाठी तर नाही ना…जर नाही तर जागोजागी हे पडलेले कचऱ्याचे घातक राक्षस का ?…या पडलेल्या आणि दिवसेंदिवस वाढ घेणाऱ्या कचऱ्यामुळे शेजारीच असलेल्या शाळेत शिकणारी मुले, परिसरातील नागरिक, यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून या भागात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्यास ढीग साठल्यामुळे धोका उद्भवू शकतो याची जाणीव तरी महानगर पालिका, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना होणे आवश्यक आहे.