मृत्यूनंतर PAN, Passport आणि Voter ID चं काय करायचं? जाणून घ्या, नाहीतर बसेल मोठा फटका!

खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या नातेवाईकांना तसेच कुटुंबियांना गमावलं. कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर आपण सर्व औपचारिकता पूर्ण करतो. मात्र अनेकदा मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कागदपत्राचं (Document) काय करायचं याबाबत अनेकांना माहिती नसतं. नियमांनुसार मृत व्यक्तीच्या पॅन कार्ड (PAN Card), आधार कार्ड (Aadhaar Card), व्होटिंग आयडी (Voter ID Card) , पासपोर्ट (Passport) या आणि यासारख्या इतर ओळखपत्रांचं काय करायचं असतं, हे आपण या बातमीतून जाणून घेऊन आहोत.*पॅन कार्ड (Pan Card)* इनकम टॅक्स रिटर्न भरत असाल तर (Income Tax Return) पॅन नंबर असणं महत्त्वाचं असत. पॅन नंबर म्हणजे तुमचा पॅन कार्ड नंबर. पॅन नंबर हा डी मॅट (D-mat Account), बँक अकाउंटसह (Bank Account) लिंक असतो. त्यामुळे मृत व्यक्तीचं पॅन कार्ड डीएक्टीव्हेट करणं महत्त्वाचं असतं. मृत व्यक्तीचं पॅन कार्ड चूकुन इतर व्यक्तीच्या हाती लागला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आव्हानात्मक प्रसंग उद्भवण्याआधी पॅन कार्ड डीएक्टीव्हेट करणं गरजेचं ठरतं.जर तुम्हाला मृत व्यक्तीचं पॅन कार्ड उपयोगी पडणार असेल, तर ते तुम्ही वापरु शकता. पण त्याचा काही वापर नसेल तर ते रद्द करायला हवं. त्यासाठी मृताच्या कुटुंबियांनी आयकर विभागाशी संपर्क करावा. पॅन कार्ड रद्द करण्याआधी कुटुंबियांनी मृत व्यक्तीच्या नावावर असलेले सर्व बँक खाते हे रद्द किंवा दुसऱ्याच्या नावे ट्रान्फर करायला हवं. *आधार कार्ड (Aadhar Card)*मृत्यूनंतर आधार कार्ड (UIDAI) रद्द करण्याची कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे मृत व्यक्तीचं आधार कार्ड सांभाळून ठेवणं ही कुटुंबियांची जबाबदारी आहे, जेणेकरुन त्याचा गरैवापर होणार नाही. संबंधित मृत व्यक्ती मृत्यूआधी जर आधार कार्डाद्वारे कोणतीही योजना किंवा सबसिडीचं लाभ घेत असल्यास त्याची माहिती संबंधित विभागाला द्यायला हवी. त्यानंतर मृत व्यक्तीचं नाव त्या योजनेतून रद्दबातलं केल जाईल.व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड लॉक केलं जाऊ शकतं. M-Aadhar या अ‍ॅप किंवा UIDAI च्या वेबसाईटद्वारे मृत व्यक्तीचं आधार कार्ड लॉक करता येऊ शकतं. यामुळे मृत व्यक्तीच्या मोबाईल नंबरचा गैरवापर होणार नाही. *वोटर आयडी कार्ड (Voter ID Card)*मृत्यूनंतर मृत व्यक्तीचं वोटिंग कार्ड रद्द करणं महत्वाचं असतं. अन्यथा मृत व्यक्तीच्या नावे बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाव रद्द करण्यासाठी स्थानिक मतदान कार्यालयात फॉर्म 7 भरावा लागतो. त्यानंतर वोटिंग कार्ड रद्द होतं.

  • Related Posts

    कोंढवा वॉर्ड १९ – उमेदवारांच्या शर्यतीत जनतेचे सवाल मात्र मागेच….! जनतेच्या प्रश्नासाठी पात्र उमेदवार लाभेल का….‽

    खादी एक्स्प्रेस प्रतिनिधी : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत मंगळवारी (दि. 11 नोव्हेंबर) जाहीर करण्यात आली तोच कोंढवा परिसरात राजकीय समीकरणांना नवी चव आली आहे. मागील काही महिन्यांपासून…

    ब्रेकिंग न्यूज: भारती विद्यापीठाकडून सराईत गुन्हेगाराला अटक; ‘अग्निशस्त्र बाळगणाऱ्या’ दोघांना बेड्या, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

    खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहर पोलीस गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत आहेत. पुणे पोलिसांच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका जुन्या वादातून जीवघेणी धमकी देऊन…

    One thought on “मृत्यूनंतर PAN, Passport आणि Voter ID चं काय करायचं? जाणून घ्या, नाहीतर बसेल मोठा फटका!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *