लोहगाव ( कालवड ) : शेअर मार्केटतुन नफ्याचे अमिष : लाखोंची फसवणुक, लोहगाव मधील अरबाज सलीम शेख विरोधात गुन्हा दाखल

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) :-शेअर मार्केटतुन नफा मिळवुन देण्याचे अमिष दाखवत गुंतवणुक करण्यास भाग पाडुन अरबाज सलीम शेख (रा. कलवड वस्ती, लोहगाव) याने तब्बल १० लाख ७७ हजार रूपयांची आर्थिक फसवणुक केली या बाबत फिर्यादी साजिद शेख (रा. कोंढवा खुर्द, पुणे) यांनी तक्रार दिली असता विमाननगर पोलिसांनी आरोपी विरोधात कलम ४०६, ४१८, ४२०, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला असुन आरोपी सध्या फरार आहे.आरोपी अरबाज शेख याने आपल्याला शेअरमार्केटची सर्व माहिती असुन मी अनेक लोकांना यातुन नफा मिळवुन देत असल्याची खोटी बतावणी केली शेअरमार्केट मध्ये पैस गुंतविण्याचा तगादा लावुन फिर्यादी साजिद शेख यांच्याकडुन सुरवातीस २ लाख रू. उकळले व त्यांनतर शेअरमार्केट मध्ये तुमचा नफा अडकला आहे तो नफा मिळवण्यासाठी आपल्याला आणखी पैसे लागतील असे अनेक भुलथापा देत वारंवार पैश्याची मागणी करून वेळोवळी तब्बल १० लाख ७७ हजार रू. लुबाडले. आरोपी अरबाज याने कराराप्रमाणे आपल्याला कोणताही नफा दिल्या नसल्याने फिर्यादी यांनी चौकशी केली असता आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरवात केली, तद्नंतर फिर्यादीने आपल्या गुंतवणुक केलेल्या रकमेबाबत विचारणा केली असता आरोपी अरबाज याने फिर्यादी यांना ‘पैसे मागितलेस तर तुझ्या विरोधात खोटी तक्रार करेल’ शब्दात धमकाविणे सुरू केले, तद्नंतर आरोपी अरबाज आपले राहते घर सोडुन फरार झाला, आपली आर्थिक फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी विमानतळ पोलिस स्टेशन येथे आरोपी विरोधात तक्रार दाखल केली त्यानुसार विमानतळ पोलिसांनी एफ.आय.आर दाखल केली असुन विमानतळ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे पुढील तपास करीत आहेत.अरबाज याने फिर्यादी साजिद शेख सह अनेक लोकांची आर्थिक फसवणुक केल्याचेही पुराव्यानिशी उघडीस आले असुन सदर आरोपीच्या जाळ्यात अडकुन आर्थिक फसवणुकीस बळी पडलेल्या लोकांनी आरोपी अरबाज शेख (रा. कलवड वस्ती लोहगाव) विरोधात तक्रार असल्यास ‘खादी एक्सप्रेस’ शी संपर्क करा अन्यथा विमानतळ पोलिस स्टेशन येथे आपली तक्रार नोंदवु शकता.

Related Posts

ब्रेकिंग न्यूज: बाणेरमध्ये दिवसाढवळ्या राडा! सुतारवाडीत चार अज्ञात चोरट्यांनी तरुणाला लुटले; ₹४० हजारांची रोकड लंपास

खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहरात भरदिवसा प्रवाशांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे पोलिसांच्या बाणेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका २६ वर्षीय तरुणाला चार…

ब्रेकिंग न्यूज: मार्केट यार्डात खळबळ! किरकोळ वादातून २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; एकाला अटक, दोन अल्पवयीन मुले ताब्यात

खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहरात किरकोळ वादातून टोकाचे पाऊल उचलून हत्या करण्याच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिबवेवाडी-कोंढवा रोडवर एका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *