ब्रेकिंग न्यूज: पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! अग्निशस्त्र व जिवंत काडतुसांसह सराईत घरफोडी करणाऱ्याला अटक; १८ लाखांचा ऐवज जप्त!

खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट ६ ने अत्यंत सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसांसह अटक करून, त्याच्याकडून तब्बल ₹१८,२२,२००/- (अठरा लाख बावीस हजार दोनशे रुपये) किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले आणि नितीन मुंढे यांना गोपनीय माहिती मिळाली की, हडपसर परिसरात घरफोडी करणारा सराईत आरोपी त्याच्या राहत्या परिसरात आला आहे. हंसराज सिंग उर्फ हंसू रणजित सिंग टाक (वय १९ वर्षे, रा. तुळजा भवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे)

दिनांक ०८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, स.पो.नि. मदन कांबळे आणि पथकाने सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून १ देशी बनावटीचे अग्निशस्त्र (पिस्तूल), १ रिकामी मॅगझीन व जिवंत काडतूस (एकूण किंमत ₹४१,४००/-), विविध वजनाचे एकूण १५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (विविध वर्णनाचे, किंमत ₹१७,८१,०००/-), एकूण जप्त मुद्देमाल ₹१८,२२,२००/- मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपी हंसराज सिंग टाक याच्याविरुद्ध हडपसर पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ९५४/२०२५, भा.ह.क. कलम ३ (२५) (आर्म्स ॲक्ट) सह म.पो.अ. ३७(१) सह १३५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून उघड झालेले गुन्हे: आरोपीकडे कसून तपास केल्यानंतर, त्याने एकूण ०३ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे: १. सहकारनगर पो.स्टे. गु.र.नं. २८६/२०२५: भा.ह.क. कलम ३०५, ३३१(४), ३(५) २. चिखली पो.स्टे. गु.र.नं. ६१५/२०२५: भा.ह.क. कलम ३३१(३)(४), ३०५ ३. भोसरी एम आय डी सी पो.स्टे. गु.र.नं. ६१०/२०२५: भा.ह.क. कलम ३३१(३), ३०५ आरोपी आणि त्याच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.

पुणे शहराचे मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, स.पो.नि. मदन कांबळे, पो.अं. नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापूरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे बाळासाहेब तनपुरे, म पो अं प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, आणि सोनाली नरवडे यांनी केली आहे.

Related Posts

कोंढवा–कौसरबाग प्रभाग १९-ब : नाझिया समीर पंजाबी स्वतंत्र उमेदवार, विकासालाच प्राधान्य

खादी एक्स्प्रेस प्रतिनिधी ( ऑनलाईन ) पुणे :- कोंढवा–कौसरबाग प्रभाग क्र. १९-ब मधील राजकीय चित्र आता स्पष्ट झाले असून नाझिया समीर पंजाबी यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र उमेदवार म्हणून…

कोंढवा खुर्द – कौसरबाग प्रभाग १९. अनुभव, वारसा आणि समाजसेवेची चौरंगी लढत

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ( ऑनलाईन ) पुणे :- पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी कोंढवा खुर्द – कौसर बाग प्रभाग क्रमांक १९ मधील पॅनल जाहीर झालं असून, या पॅनलने नागरिकांमध्ये चर्चेला वेग…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *