ब्रेकिंग न्यूज: चतुःश्रृंगी परिसरात जुन्या वादातून हल्ला! बाबा हॉस्पिटलजवळ तरुणाला लोखंडी हत्याराने मारून जखमी केले; एका आरोपीला अटक

खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहरात किरकोळ कारणावरून वाद होऊन त्यातून एकमेकांवर हल्ला करण्याच्या घटना समोर येत आहेत. पुणे पोलिसांच्या चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दिनांक ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ब्लॉक नं. ५०, भाभा हॉस्पिटलच्या मागे, वडारवाडी, पुणे या ठिकाणी हा हल्ला झाला.

फिर्यादी (वय ३५ वर्षे, रा. वडारवाडी, पुणे) यांना कोणत्याही ठोस कारणाशिवाय आरोपीने अडवले. सागर संजय बनपट्टे (वय ३६ वर्षे, रा. ब्लॉक नं. ५१, भाभा हॉस्पिटलच्या मागे, वडारवाडी, पुणे) अटक केलेल्या आरोपी सागर बनपट्टे याने फिर्यादीच्या हातातील लोखंडी हत्याराने मारहाण करून त्यांना जखमी केले. हा हल्ला किरकोळ कारणावरून झाला असून, आरोपीने शांतता भंग करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गु.र.नं. ४४१/२०२५, भा.न्या.सं.क. ११८(१) कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार वैदू यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार वैदू आणि त्यांच्या पथकाने तत्परता दाखवत आरोपी सागर बनपट्टे याला अटक केली आहे. चतुःश्रृंगी पोलिसांनी अशा सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या कृत्यांवर कारवाई करून परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्परता दाखवली आहे.

Related Posts

कोंढवा–कौसरबाग प्रभाग १९-ब : नाझिया समीर पंजाबी स्वतंत्र उमेदवार, विकासालाच प्राधान्य

खादी एक्स्प्रेस प्रतिनिधी ( ऑनलाईन ) पुणे :- कोंढवा–कौसरबाग प्रभाग क्र. १९-ब मधील राजकीय चित्र आता स्पष्ट झाले असून नाझिया समीर पंजाबी यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र उमेदवार म्हणून…

कोंढवा खुर्द – कौसरबाग प्रभाग १९. अनुभव, वारसा आणि समाजसेवेची चौरंगी लढत

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ( ऑनलाईन ) पुणे :- पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी कोंढवा खुर्द – कौसर बाग प्रभाग क्रमांक १९ मधील पॅनल जाहीर झालं असून, या पॅनलने नागरिकांमध्ये चर्चेला वेग…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *