ब्रेकिंग न्यूज: खराडीत घड्याळांच्या दुकानात घरफोडी! चोरट्यांनी स्लाइडिंग विंडोचे लोखंडी ग्रील तोडून ₹११ लाखांहून अधिक किमतीची विविध कंपन्यांची घड्याळे चोरली

खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहरात रात्रीच्या वेळी बंद दुकाने फोडून चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे पोलिसांच्या खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका घड्याळांच्या दुकानात घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्यांनी तब्बल ₹११,०७,०००/- (अकरा लाख सात हजार रुपये) किमतीची विविध कंपनीची घड्याळे चोरून नेली आहेत.दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ०९:०० वाजल्यापासून ते दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. खराडी, पुणे येथील शॉप नं. ०२, मिळकत नं. २५९८, तुळजा भवानीनगर या ठिकाणी फिर्यादीच्या घड्याळाच्या दुकानात चोरी झाली.

फिर्यादी (वय ५० वर्षे, रा. खराडी, पुणे) यांचे नमूद ठिकाणी घड्याळांचे दुकान आहे. दुकान कुलूप लावून बंद असताना, कोणीतरी अज्ञात चोरट्याने हे कृत्य केले. चोरट्याने दुकानाच्या मेन काउंटरच्या मागील बाजूस असलेल्या स्लाइडिंग विंडोचे लोखंडी ग्रील कशाच्या तरी सहाय्याने कापून आत प्रवेश केला. दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने दुकानात ठेवलेली ₹११,०७,०००/- (अकरा लाख सात हजार रुपये) किंमतीची विविध कंपनीची रिस्ट वॉचेस घरफोडी करून चोरून नेली. या घरफोडीच्या गुन्ह्याप्रकरणी खराडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गु.र.नं. २४६/२०२५, भा.न्या.सं.क. ३३१(३) , ३३१(४) कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे आणि त्यांचे पथक या चोरीच्या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करत आहे. रात्रीच्या वेळी बंद दुकाने लक्ष्य करणाऱ्या या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची आणि तांत्रिक माहितीची कसून तपासणी करत आहेत.

Related Posts

कोंढवा–कौसरबाग प्रभाग १९-ब : नाझिया समीर पंजाबी स्वतंत्र उमेदवार, विकासालाच प्राधान्य

खादी एक्स्प्रेस प्रतिनिधी ( ऑनलाईन ) पुणे :- कोंढवा–कौसरबाग प्रभाग क्र. १९-ब मधील राजकीय चित्र आता स्पष्ट झाले असून नाझिया समीर पंजाबी यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र उमेदवार म्हणून…

कोंढवा खुर्द – कौसरबाग प्रभाग १९. अनुभव, वारसा आणि समाजसेवेची चौरंगी लढत

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ( ऑनलाईन ) पुणे :- पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी कोंढवा खुर्द – कौसर बाग प्रभाग क्रमांक १९ मधील पॅनल जाहीर झालं असून, या पॅनलने नागरिकांमध्ये चर्चेला वेग…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *