नाझिया समीर पंजाबी : कौसर बाग–कोंढवा प्रभाग १९ बी मधून सामाजिक कार्यातून नगरसेवक पदाकडे वाटचाल

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ( ऑनलाईन ) पुणे:गेल्या १५ वर्षांपासून नाझिया समीर पंजाबी यांचे पती समीर इक्बाल पंजाबी यांच्यासोबत सातत्याने सामाजिक कार्य करत आहेत. त्यांनी नेहमीच कामाला प्राधान्य दिले असून त्यांचे कार्य थेट सामान्य नागरिकांच्या जीवनाशी जोडलेले राहिले आहे.नाझिया पंजाबी यांनी विविध भागांत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून नागरिकांना प्राथमिक आरोग्यसेवेचा लाभ मिळवून दिला. अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी प्रशासनाकडे तक्रारी दाखल करून कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी पाठपुरावा केला.महिलांच्या प्रश्नांवरही त्यांनी सातत्याने भूमिका मांडली आहे. महिलांसाठी मोफत बससेवेची मागणी, तसेच सार्वजनिक बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत यासाठी त्यांनी निवेदने दिली. महिलांना सुरक्षित आणि आत्मविश्वासाने प्रवास करता यावा, हा या मागण्यांचा मुख्य उद्देश राहिला आहे.प्राणी कल्याणासाठी ही त्यांनी काम केले आहे. भटक्या प्राण्यांसाठी मोफत औषधोपचार व उपचार मोहिमा राबवून त्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवली आहे. या उपक्रमांमध्ये स्थानिक स्वयंसेवक आणि डॉक्टरांचा सहभाग होता.या सर्व सामाजिक कामात त्यांनी कुटुंबीय आणि सहकाऱ्यांसोबत संघभावनेने काम केले. आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये नाझिया समीर पंजाबी या कोंढवा – कौसर बाग प्रभाग क्रमांक १९ ब येथून नगरसेवक पदासाठी उभ्या राहत आहेत. त्यांच्या या निर्णयाकडे अनेक नागरिक सामाजिक कार्यातून पुढे आलेली जबाबदार नेतृत्वाची पायरी म्हणून पाहत आहेत.कोंढवा–कौसर बाग परिसरात नाझिया समीर पंजाबी यांची ओळख शांत, सातत्याने काम करणाऱ्या आणि लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ती अशी आहे. आगामी निवडणुकीत त्यांचा हा सामाजिक अनुभव महत्त्वाची भूमिका बजावेल, असे स्थानिक नागरिकांचे मत आहे.

Related Posts

कोंढवा–कौसरबाग प्रभाग १९-ब : नाझिया समीर पंजाबी स्वतंत्र उमेदवार, विकासालाच प्राधान्य

खादी एक्स्प्रेस प्रतिनिधी ( ऑनलाईन ) पुणे :- कोंढवा–कौसरबाग प्रभाग क्र. १९-ब मधील राजकीय चित्र आता स्पष्ट झाले असून नाझिया समीर पंजाबी यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र उमेदवार म्हणून…

कोंढवा खुर्द – कौसरबाग प्रभाग १९. अनुभव, वारसा आणि समाजसेवेची चौरंगी लढत

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ( ऑनलाईन ) पुणे :- पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी कोंढवा खुर्द – कौसर बाग प्रभाग क्रमांक १९ मधील पॅनल जाहीर झालं असून, या पॅनलने नागरिकांमध्ये चर्चेला वेग…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *