कोंढवा वॉर्ड १९ – उमेदवारांच्या शर्यतीत जनतेचे सवाल मात्र मागेच….! जनतेच्या प्रश्नासाठी पात्र उमेदवार लाभेल का….‽

खादी एक्स्प्रेस प्रतिनिधी : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत मंगळवारी (दि. 11 नोव्हेंबर) जाहीर करण्यात आली तोच कोंढवा परिसरात राजकीय समीकरणांना नवी चव आली आहे. मागील काही महिन्यांपासून निवडणूक केव्हा जाहीर होते याची प्रतीक्षा करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची धडपड आता आणखी वाढली असून, आधीच सक्रिय असलेले माजी नगरसेवक आणि नवीन इच्छुक उमेदवार यांच्यात सरळ सरळ मुकाबला निर्माण झाला आहे.
यंदा महापालिकेची निवडणूक ही प्रभाग पद्धतीने होणार असून यानुसार प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक असणार आहेत पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी नगरसेवकांच्या एकूण 165 जागा आहेत. निवडणुकीसाठी एकूण 41 प्रभाग असणार आहेत. एकूण प्रभागांपैकी 40 प्रभागात प्रत्येकी चार तर, एका प्रभागात पाच नगरसेवक असणार आहेत. त्यातच कोंढवा खुर्द प्रभाग १९ साठी एका प्रभागात २ पुरुष आणि २ महिला जागा अशा जागा असल्याने माजी नगरसेवक यांचे महिला वर्ग तसेच नवे महिला उमेदवार ही रणांगणात उतरले आहेत…

नेमके मुद्दे ‘ जैसे थे ‘ च :-
मागील पाच वर्षे कोंढव्यात “हक्काचा नगरसेवक” नसल्याने नागरिकांचे बरेचसे प्रश्न वाऱ्यावरच होते काही माजी नगरसेवक तर काही इच्छुक उमेदवार निवडणुकीची तयारी म्हणून सक्रिय तर दिसलेच पण लाईट, कचरा आणि वाहतूक हेच मुद्दे हाती धरून आपली छाप लोकां मधे छापण्याच्या शर्यतीत राहिले… पण नागरिकांची अडचण, मागणी फक्त रस्ते, पाणी, या पुरतीच नाही हे एकही उमेदवाराच्या कामातून दिसून आले का ‽ पाणी, लाईट, रस्ते हे तर गरजेचे आहेच त्यात प्रश्न नाही पण आपल्या विभागात गुन्हेगारी का वाढत आहे… नव युवकांना रोजगार साठी काय उपाययोजना आहे जेणे करून ते गुन्हेगारी पासून दूर राहतील… आपल्या विभागाचा विकास व्हावा या बाबतच्या भविष्यातील वाटचाली उपाययोजना हे मुद्दे तर कुठे तरी कोपऱ्यातच धूळ खात आहे, गरजेच्या रस्ते, पाणी, लाईट सोबत अती महत्वाच्या मुद्यापर्यंत अजून कोणी पोहचले का..‽ नागरिकांच्या अडचणी आता फक्त मर्यादित राहिलेल्या नाही बदलत्या काळा सोबत पुढे जाण्याच्या लोकांच्या मागण्या उमेदवार आणि भावी नगरसेवक यांच्या पर्यंत पोहचल्या नाहीत की मला सत्ता मिळावी या साठीच्या फक्त शर्यतीत इन्स्टाग्रामवर फेसबुक वरून आपल्या मोघम कामाचे प्रदर्शन करायचे…… मोघम काम या साठी कारण मागील बऱ्याच वर्षा पासून जेव्हा नगरसेवक म्हणून खुर्ची रिकामी असताना ही आम्ही रस्ते बनवत आहोत … रस्ता नवीन बनवला… म्हणून रिल्स वाढत गेल्या आणि ८- – १० दिवसांत पुन्हा रस्ता जैसे थे परिस्थित असल्याच्या निदर्शनास आले आणि या वेळेस तोच रस्ता कोणी दुसरे माजी नगरसेवक किंवा इच्छुक उमेदवार दुरुस्त करतानाचे चित्र दिसले … एकच रस्ता आळीपाळीने बनवून आपला शिक्का मोर्तब करणे हेच यातून दिसले…नुसतेच कौसरबाग परिसरात खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याची दुरुस्ती करून इंस्टा फेसबुक वर जाहिरात दिली आणि हातावर मोजता येईल इतक्या वेळेत रस्त्यावरचा मोघम काम जनते समोर आला…. यात दिसून येतो तो दिखावापणा आणि काय काम केले याची यादी वाढवण्यासाठी केलेले तात्पुरती मलमपट्टी… यात दोष त्या उमेदवाराचा..नगरपालिकेचा…कॉन्ट्रॅक्टर.. की निकृष्ट दर्जाच्या डांबर वाळूचा..हा तर फक्त एक उदाहरण… असे अनेक प्रश्न आहेत जे तात्पुरते ४- ५ आठवड्यासाठी ठीक करण्यात आले …या पलीकडे कोंढवा परिसरात वाढती गुन्हेगारी चे मूळ कारण बेरोजगारी… गरीब लोकांच्या आवाक्या बाहेरची शिक्षण व्यवस्था असे अनेक अडचणी प्रश्न यासाठी कोणत्याही उमेदवाराचे प्रयत्न दिसून येत नाही… सेलिब्रिटी बोलावून आपले नाव लोकांच्या लक्षात आणून देण्याच्या शर्यतीत नागरिकांचे मूळ प्रश्न अजूनही त्याच जागी आहे….

नागरिकांच्या मताने पद मिळवून जिंकणारा उमेदवार आपली मूळ समस्या अडचण समजून घेईल का…आपल्या प्रभागाच्या विकासासाठी दमदार नेतृत्व सह…..आपल्या मुलांच्या भविष्य शिक्षण यासाठीचा विचार आणि योग्य अशा उपाययोजना करु शकेल का….‽ असे अनेक प्रश्न अद्याप नागरिकां पुरतेच राहिले आहेत… चढाओढीच्या शर्यतीत मतदारांच्या अमूल्य मताचा गैरवापर तर होणार नाही आपले मत वाया तर जाणार नाही हा नागरिकाचा मूळ सवाल आहे… पण शर्यतीत व्यस्त असणारे उमेदवार रस्ते पाणी लाईट या मोघम कामापासून अजून पुढे सरकलेले दिसत नाही….

जनतेला आता वारंवार एकाच अडचणीवर मोघम काम करणारे ४ प्रतिनिधी नकोय….. विकासाचा पक्का भरोसा आणि त्यासाठीच्या उपायोजना….. नागरिकांच्या निर्णयाची त्यांच्या अमूल्य मताची जाण ठेऊन पक्के आणि विश्वासार्ह काम करणारा नगरसेवक हवा आहे… नवा बदल हवा आहे आपल्या साठी आपल्या पुढच्या पिढीसाठी गुन्हेगारी आणि बेरोजगारी मुक्त वातावरण हवा आहे…

हेच मुद्दे आता ” खादी एक्स्प्रेस” आपल्या पुढील साप्ताहिकात आपल्या ‘ कोंढवा – 19’ या निवडणूक विशेष लेखातून मांडणार आहे… उमेदवार देखील आपली मते, विचार, नवा बदल विकासासाठी उपाययोजना आणि आज पर्यंतचे विकासकामे आमच्या लेखातून जनते पर्यंत पोहचवू शकतात यासाठी आम्हाला संपर्क करा …

Related Posts

ब्रेकिंग न्यूज: भारती विद्यापीठाकडून सराईत गुन्हेगाराला अटक; ‘अग्निशस्त्र बाळगणाऱ्या’ दोघांना बेड्या, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहर पोलीस गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत आहेत. पुणे पोलिसांच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका जुन्या वादातून जीवघेणी धमकी देऊन…

ब्रेकिंग न्यूज: खडक मध्ये ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक! ‘मनी लॉन्ड्रिंग’ प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन ₹३४.८५ लाखांचा सायबर गंडा

खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहरात सायबर गुन्हेगार ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणात फसवणूक करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *